Devendra Fadnavis : महापालिका निवडणुकांचे पडघम सुरू… मुख्यमंत्र्यांची मतदारांना अ‍ॅडवान्समध्ये घातली साद

Devendra Fadnavis : महापालिका निवडणुकांचे पडघम सुरू… मुख्यमंत्र्यांची मतदारांना अ‍ॅडवान्समध्ये घातली साद

| Updated on: Jun 11, 2025 | 7:40 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या महापालिका निवडणुकीवर भाष्य करत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोमात कामाला लागावं लागेल, असं पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

निवडणुकीत महायुतीला निवडून द्या, अशी अ‍ॅडवान्समध्ये विनंती करतो, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य करत राज्यातील मतदारांना ही साद घातली आहे.’महानगरपालिका असो, नगरपालिका असो की नगरपंचायत असो… जिल्हा परिषद, पंचायत समिती असो.. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आपल्या महायुतीला निवडून द्या..’, अशी विनंती वजा साद देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मतदारांना घातल्याचे पाहायला मिळाले. जसं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये द्या, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना केलं आहे.

Published on: Jun 11, 2025 07:40 PM