Beed Murder Case Video : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लागणार? ॲड. उज्ज्वल निकम मैदानात, मारेकऱ्यांची आता खैर नाही!
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर देशमुख कुटुंब आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी अननत्याग आंदोलन मागे घेतले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आणि विनंतीला मान देत देशमुख कुटुंबियां सह मसाजोगच्या ग्रामस्थांनी अननत्याग आंदोलन स्थगित केलंय. निकमांच्या नियुक्तीनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगला येत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण सहा मागण्या आहेत. ज्यामधील ॲड. निकमांच्या नियुक्तीची मागणी पूर्ण झाली. मात्र आका अर्थात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग सोबत फिरणारा पीएसआय राजेश पाटील आणि कारवाईमध्ये दिरंगाई करणारे पीआय प्रशांत महाजन यांनाही सह आरोपी करण्याची मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील केलीये.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सहा आरोपी गजाड आहेत. मात्र पावणे तीन महिने उलटून देखील कृष्णा आंधळे फरार आहे. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी शंका उपस्थित केली आहे. पोलिसांच्या हाती कृष्णा आंधळे लागत नाही. त्यामुळे त्याचा खून झाला की भारताबाहेर तो पळून गेला असा सवाल खुद्द मंत्री महोदय करतायत. बीड पोलिसांकडून अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यावर सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांचं काम सुरू होईल. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर आंधळे हे सध्या अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे फरार आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीतूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणीत कोण कोण आहेत हे ॲड. उज्ज्वल निकमांना सिद्ध करावे लागेल. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
