Devendra Fadnavis : लोकलची गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा काय?
काल झालेल्या मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळतेय.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी नऊवाजेच्या सुमारास एक मोठी घटना घडली. यामध्ये कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेनंतर वाढलेल्या गर्दीमुळे असे अपघात होत असल्याची चर्चा आहे. अशातच लोकलमधील ही वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळत बदल करण्यात आला आहे. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणं थोडं कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले.
