Devendra Fadnavis : मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा

Devendra Fadnavis : मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा

| Updated on: Apr 11, 2025 | 7:25 PM

'महाराष्ट्रातले 132 स्टेशन केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करिता घेतलेले आहेत. त्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे.', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर रेल्वे सेवा अधिक सुधारण्यावर भर असणार आहे. मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून मुंबईला मनोजरंजनासाठी जागतिक राजधान बनवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे, असे म्हणत मुंबईत झालेल्या फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईसह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यात.

केंद्र सरकार महाराष्ट्रात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्राला रेल्वे बजेटमधून 23 हजार 700 कोटी मिळाले. गोदिया ते बल्हारशहा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, केंद्रकडून 4,819 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, यात CSMT स्थानकाचा समावेश आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार असून या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.

Published on: Apr 11, 2025 07:25 PM