CM Fadnavis : शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये घेण्याबाबतच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या. "ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष असून तीच खरी शिवसेना आहे," असे ते म्हणाले. भाजप अशा प्रकारचे राजकारण करत नाही, उलट शिवसेनेला मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातील 22 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करत असून, त्यातील एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणवत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्याच्या चर्चा फेटाळल्या. “आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचे काय आहे? ते आमचेच आहेत,” असे ते म्हणाले. शिंदे सेना ही भाजपची मित्रपक्ष असून, तीच खरी शिवसेना आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप अशा प्रकारचे राजकारण करत नाही, उलट शिवसेनेला मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी नमूद केले. भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महायुती अधिक मजबूत होताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
