‘उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय…’, एकनाथ शिंदे यांची खोचक टीका

| Updated on: Apr 24, 2024 | 12:59 PM

राज्यात, केंद्रात सुरू असलेलं मोदी यांचं काम हे सगळं बघून उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार', असे म्हणत सातत्याने करण्यात येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

‘उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतो. राज्यात सुरू असलेली विकास कामं आणि जनता देत असलेला सकारात्मक प्रतिसाद, राज्यात सध्या महायुतीचा माहोल सुरू झाला आहे. राज्यात, केंद्रात सुरू असलेलं मोदी यांचं काम हे सगळं बघून उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार’, असे म्हणत सातत्याने करण्यात येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला आणि आरोपाला कामाने उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अकोल्यात होते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. त्यांच्यासोबत अन्य इतर शिवसेनेचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी होते. यावेळी शिंदेंनी असेही म्हटले की, लवकरच राज्यातला सर्व जागांचा तिढा सुटणार आहे. कुठे गुंता नाहीये. महायुतीत मतभेद नाहीये. असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

Published on: Apr 24, 2024 12:58 PM