मुंबईत सर्वसामान्यांना दिलासा; CNG च्या दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

| Updated on: Feb 01, 2023 | 10:11 AM

वाहन चालकांना मोठा दिलासा, मुंबईत सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रूपयांनी घट

Follow us on

मुंबई : मुंबईत सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रूपयांनी घट झाल्याने सर्वसमान्य वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात ही कपात केली आहे. सीएनजीचा दर किलोमागे 89.50 रूपयांवरून 87.00 रूपये करण्यात आला आहे. केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वीच दर कमी झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. 31 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मात्र पाईप गॅसचा दर हा गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रति घन मीटर 54 रूपयांनी वाढलेला दर हा तसाच कायम आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलेलंच आहे. महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या किंमतीत सुधारणा करत किलोमागे दर 2.50 रूपयांनी कमी केले आहे. मात्र घरगुती पाईपचा दर कायमच ठेवला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांसाठीच हा दिलासा असणार आहे.