मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांची पुण्यात जंगी मिरवणूक

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांची पुण्यात जंगी मिरवणूक

| Updated on: Aug 03, 2025 | 1:38 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनंतर सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले गेले आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतर आरोपींचा मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्त केले. पुण्यात परतल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित आज पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जंगी मिरवणूक पुण्यात काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात प्रसाद पुरोहित यांचे स्वागत यावेळी केले गेले. लागलेल्या निकालाबाबत मला आनंद आहे, माझं कुटुंब आज माझ्या स्वागतासाठी आलं आहे, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कर्नल पुरोहित यांनी माध्यमांना दिली आहे.

2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे.सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. आता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आज कर्नल पुरोहित आपल्या पुण्यातील घरी आज दाखल झाले आहेत.

Published on: Aug 03, 2025 01:37 PM