दिल्लीसह देशात दंगली घडवल्या जात आहेत…
देशाच्या राजधानी असणाऱ्या दिल्लीतील काही भागात संघर्ष आणि दंगे झाले. ज्या दिल्लीची सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या हातात आहे, मात्र दिल्लीचं गृहखातं हे भाजपच्या हातात, अमित शहा यांच्याकडे आहे, दिल्लीसारख्या राजधानी असणाऱ्या शहरात गृहखातं तुमच्याकडे असूनसुद्धा हल्ले आणि संघर्ष झाले.
देशाच्या राजधानी असणाऱ्या दिल्लीतील काही भागात संघर्ष आणि दंगे झाले. ज्या दिल्लीची सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या हातात आहे, मात्र दिल्लीचं गृहखातं हे भाजपच्या हातात, अमित शहा यांच्याकडे आहे, दिल्लीसारख्या राजधानी असणाऱ्या शहरात गृहखातं तुमच्याकडे असूनसुद्धा हल्ले आणि संघर्ष झाले. या अशा घटना दिल्लीसारख्या शहरात घडत असतील तर जगात एक संदेश जातो की, भारतात अस्थिरता आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते. शेजारी असणाऱ्या कर्नाटकसारख्या राज्यात तर यापेक्षा परिस्थिती भयानक आहे. त्या ठिकाणी गावागावातून अल्पसंख्यांक असणाऱ्या ठिकाणी लिहिलं गेलं आहे की, येथे अल्पसंख्याक समाजातील दुकान आहे, त्याठिकाणी खरेदी करु नका असं लिहण्याचं धाडस का होतं आहे. असा सवालही शरद पवार यांनी कोल्हापूरात झालेल्या सभेत केला.
Published on: Apr 24, 2022 12:21 AM
