Special Report | Mumbai मध्ये काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने!
काँग्रेस भाजपच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल तर आम्ही उत्तर देऊ, पोलिसांच्या विनंती मुळं थांबत आहोत. पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलक कार्यकत्यांना अटक केली नाही तर आम्ही येथून पुढं जाऊ, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. काँग्रेसनं पेगाससच्या मुद्यावर भाजप विरोधात आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आक्रमक झाले आहेत. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह प्रसाद लाड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं निघाले होते. पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला आहे. मुंबईत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपवर (BJP) कुणी गुंडशाहीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पद्धतीनं उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. आम्हाला धमक्या देऊ नका, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. काँग्रेस भाजपच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल तर आम्ही उत्तर देऊ, पोलिसांच्या विनंती मुळं थांबत आहोत. पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलक कार्यकत्यांना अटक केली नाही तर आम्ही येथून पुढं जाऊ, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. काँग्रेसनं पेगाससच्या मुद्यावर भाजप विरोधात आंदोलन सुरु केलं आहे.
