Sangeeta Tiwari : कॉंग्रेस सोडायला मजबूर केलं; संगीता तिवारींचे गंभीर आरोप, राहुल गांधी, खरगेंचंही नाव घेतलं

Sangeeta Tiwari : कॉंग्रेस सोडायला मजबूर केलं; संगीता तिवारींचे गंभीर आरोप, राहुल गांधी, खरगेंचंही नाव घेतलं

| Updated on: May 20, 2025 | 1:28 PM

Sangeeta Tiwari resignation : कॉंग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षातील लोकांवर काही गंभीर आरोप केलेले आहेत.

कॉंग्रेस नेत्या संगीता तिवारी या कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. शहराध्यक्षांच्या मनमानीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. महिला कॉंग्रेसचं कार्यालय बंद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. याबद्दल वरिष्ठांना अनेकवेळा तक्रार करूनही कोणतं पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे पक्ष सोडत असल्याचं तिवारी यांनी म्हंटलं आहे.

संगीता तिवारी यांनी अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. यावेळी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना संगीता तिवारी म्हणाल्या की, मला कॉंग्रेस सोडण्यासाठी मजबूर केलं जातं आहे. पुणे शहर प्रभारी अध्यक्ष म्हणून जे काम करत आहेत, त्यांच्या त्रासाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अजून मी पक्ष सोडलेला नाही, पण मी सोडणार आहे. महिला कॉंग्रेसचं कार्यालय त्यांनी बंद केलं, त्याबद्दल मी पटोले साहेबांना बोलले. राहुल गांधींना देखील मेल केले. वरिष्ठ पातळीवर असलेल्या प्रत्येकाला मेल आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Published on: May 20, 2025 01:28 PM