Vijay Wadettiwar : वडेट्टीवार हे काय बोलून गेले… सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हाती तुतारी अन् दोन..
विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे वर्णन "सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हाती तुतारी आणि दोन कासरे" असे केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे कासरे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बैलगाडीचे बैल कोण हे त्यांनी उघड केले नाही. हे विधान सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत असल्याचे दिसते.
सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हाती तुतारी आणि दोन कासरे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. कासरे मुख्यमंत्र्यांच्याच हातामध्ये आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. बैलगाडीचे बैल कोण हे मी सांगू शकत नाही, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. ‘सध्या तरी या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी पण आहे आणि ते दोन कासरे पण आहेत. तुतारीने त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरेला सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल.’, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
‘कदाचित त्यांना घड्याळ म्हणायचं असावं आणि त्यांना ते कळलंच नाही आणि आम्ही रोज रोज त्यांच्याबरोबर तिथं बसत असल्यामुळे विजय वडेट्टीवारांबरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर त्यामुळे आमची थोडीशी रोजची सवय असल्यामुळे घड्याळ बोलण्याऐवजी ते तुतारी बोलले असावेत’, असं रोहित पवार म्हणालेत.
