अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो

| Updated on: Jul 14, 2025 | 6:16 PM

परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो असल्याने वाद निर्माण झाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून, शहरात शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, काही बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो लावण्यात आला आहे, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर, पोलीस ठाणे परिसर आणि रेल्वे उड्डाणपूल परिसरात लावलेल्या या शुभेच्छा बॅनरांवर वाल्मिक कराड याचा फोटो दिसून आला आहे. विशेष बाब म्हणजे, कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या दोषमुक्तीबाबतचा निर्णय 22 जुलै रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या बॅनरवर त्याच्या फोटोचा समावेश असल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तसेच अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Published on: Jul 14, 2025 06:16 PM