Mumbai vaccination | मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंदच

Mumbai vaccination | मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंदच

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 8:48 AM

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (शनिवार, 10 जुलै)लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डातील 7 लसीकरण केंद्रांतून आतापर्यंत 1 लाख नागरिकांचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची महिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

Published on: Jul 10, 2021 08:48 AM