वसई विरार ईडी छापेमारी; अनिल पवारांची शिफारस केली होती? दादा भुसेंनी उत्तर देणं टाळलं
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर काल ईडीची कारवाई झाली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती, की नाही? या प्रश्नावर थेट उत्तर देणं मंत्री दादा भुसे यांनी टाळलं आहे. अनिल पवार हे माझे नातेवाईक आहेत, असं दादा भुसे यांनी म्हंटलं आहे. मात्र त्यांच्या शिफारशीवर उत्तर देणं त्यांनी टाळलं आहे.
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर काल ईडीची कारवाई झाली आहे. तब्बल 18 तास ही कारवाई सुरू होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यानंतर दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच अनिल पवार यांना बढती देण्यात आली होती, असा दावा दादा भुसे यांनी केला आहे. तसंच अनिल पवार हे माझे नातेवाईक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बढतीच्या शिफारशीच्या आरोपावर मात्र थेट उत्तर देणं भुसे यांनी टाळलं.
