Ajit Pawar : काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान

Ajit Pawar : काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान

| Updated on: May 14, 2025 | 9:36 AM

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार गटासोबत एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.

पक्षाची गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून एकत्र येण्याबाबत विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवार यांनी या संदर्भात विधान केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची दर आठवड्याला आढावा बैठक होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होते. मात्र काल ही बैठक वाबईनेत मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी झाली. याच बैठकीत आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित दादांनी शरद पवारांच्या पक्षाकडून अद्यापही एकत्रिकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याला आलेला नाही. मात्र शरद पवारांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे, हीच गळती रोखण्यासाठी त्यांनी एकत्रित येण्याबाबत विधान केलं असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: May 14, 2025 09:36 AM