Eknath Shinde : बाप बाप रहेगा.., नानांनी लक्षात ठेवावं; शिंदेंचा पटोलेंना थेट इशारा

Eknath Shinde : बाप बाप रहेगा.., नानांनी लक्षात ठेवावं; शिंदेंचा पटोलेंना थेट इशारा

| Updated on: Jul 01, 2025 | 5:36 PM

DCM Eknath Shinde On Nana Patole : नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी देखील पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.

नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, मोदींवर टीका करून चर्चेत राहता येते, त्यामुळे ‘बाप तो बाप होता है’, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे. नाना पटोले यांनी आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पटोलेंवर ही टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे, हे देखील नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाहीये. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करतात, असंही यावेळी शिंदेंनी म्हंटलं.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नाना पटोले हे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना सर्व कामकाजाची माहिती आहे. विधानसभेच्या सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे, हे देखील त्यांना माहीत आहे. पण ते आज एवढे हेक्टीक का झाले ते माहीत नाही. नाना पटोलेंकडून या कृतीची अपेक्षा नव्हती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Published on: Jul 01, 2025 05:36 PM