Eknath Shinde : … मग आमचं काय होणार? मोठेपणी कोण होणार? शाळेच्या पहिल्या दिवशी शिंदेंचा चिमुकल्यांना सवाल अन्… बघा मिश्किल संवाद

Eknath Shinde : … मग आमचं काय होणार? मोठेपणी कोण होणार? शाळेच्या पहिल्या दिवशी शिंदेंचा चिमुकल्यांना सवाल अन्… बघा मिश्किल संवाद

| Updated on: Jun 16, 2025 | 1:34 PM

२०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षाची आजपासून राज्यभरात सुरूवात झाली आहे. साताऱ्यात हजर असताना एकनाथ शिंदेंनी कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर विभागात आज सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर राज्यभरातील शाळा सुरू होत असून आजपासून २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडे नवीन गणवेश, दप्तर, पुस्तके आणि बऱ्याच दिवसानंतर शाळेतील मित्र भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी एक गुलाब आणि चॉकलेट देऊन चिमुकल्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी गोड स्वागत केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना विचारले कोणाला मोठं होऊन काय व्हायचंय? यानतंर तेच म्हणाले मुख्यमंत्री व्हायचंय? असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी मिश्किलपणे चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Published on: Jun 16, 2025 01:34 PM