Delhi CM Attacked : ‘तो’ पुढे आला त्यानं रेखा गुप्तांचं डोकं टेबलावर आदळलं अन्… दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर कोणी केला हल्ला?

Delhi CM Attacked : ‘तो’ पुढे आला त्यानं रेखा गुप्तांचं डोकं टेबलावर आदळलं अन्… दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर कोणी केला हल्ला?

| Updated on: Aug 20, 2025 | 7:02 PM

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जनता दरबाराच्या वेळी एकाकडून दगड फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेखा गुप्ता जखमी झाल्याची देखील शक्यता आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी देखील ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून घटनेबाबत आता तपास सुरू आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर आज हल्ला करण्यात आलाय. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. हल्लेखोर राजेश साकरीया हा गुजरातचा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी जनसुनवाणी दरम्यान एका व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले. रेखा गुप्तांवर हल्ला करणारा त्यांच्या राजकोटचा राहणारा असून त्यांचं नाव राजेश खीमजीभाई साकरीया असं आहे. जनसुनवाणीसाठी मुख्यमंत्री आल्या आणि लगेच या व्यक्तीनं एक कागद रेखा गुप्तांना दिला आणि पुढे येत हल्लेखोरांना त्यांचे डोकं टेबलावर आदळलं. रेखा गुप्ता यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही हल्ल्याची निंदा केली. हल्लेखोराच्या आईने तो मानसिकरित्या आजारी असल्याचा दावा केलाय. तो श्वानप्रेमी असल्याचेही त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या कुत्र्यासंदर्भातील निर्णयानंतर राजेश साकरीया दिल्लीत आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Published on: Aug 20, 2025 07:02 PM