शिंदे गटाची भीती खरी ठरली? राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडेच

शिंदे गटाची भीती खरी ठरली? राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडेच

aslam shanedivan | Updated on: Jul 10, 2023 | 1:01 PM

तर त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि शिंदे मुख्यमंत्री झाले तर शिंदे-फडणवीस सरकार आले.

मुंबई : 2019 मधील महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद होतं. त्यांच्याकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे अनेकदा आमदारांनी बोलून दाखवले होते. तर त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि शिंदे मुख्यमंत्री झाले तर शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे अर्थखातं गेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अजित पवारांकडेच राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत. त्यामुळे हा धक्का नेमका मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशी चर्चा आहे. कारण सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्थखातं हे फडणवीस यांच्याकडे होतं. तर शिंदे गटातील आमदाराचं विरोध असतानाही ते अजित पवार यांच्याकडे गेलं आहे.

Published on: Jul 10, 2023 1:01 PM
Follow Us