आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट? फडणवीस यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण, बंद दाराआड काय शिजलं?

| Updated on: May 20, 2023 | 1:22 PM

भाजप देशमुखांना सावनेरमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चाही यानंतर रंगली आहे. तर काँग्रेसने आशिष देशमुखांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आधी बावनकुळे आणि आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी त्यांच्या घरी थेट भेट घेतल्याने देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

Follow us on

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली. यावेळी यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. यामुळे पुन्हा एकदा देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. भाजप देशमुखांना सावनेरमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चाही यानंतर रंगली आहे. तर काँग्रेसने आशिष देशमुखांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आधी बावनकुळे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी त्यांच्या घरी जात थेट भेट घेतली आहे. त्यामुळे देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. तर फडणवीस सध्या नागपूर जिल्ह्यातील हिंगणा व उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान देशमुख, फडणवीस, बावनकुळे या तिघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. चर्चेचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी देशमुख हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे आशिष देशमुख यांनी या सर्व शक्यतांचं खंडण केलं आहे.