Video | फाइलींवर बसून राहणारं आमचं सरकार नाही, उद्धव ठाकरेंवर भाजपचा आणखी एक बाण!

| Updated on: Sep 24, 2022 | 2:58 PM

शिंदे साहेब असो किंवा मी अतिशय वेगाने काम करतो. 20-29 ची मॅच आम्हाला खेळायची आहे. कारण दोन सव्वा दोन वर्षच आमच्या हातात आहेत, असं फडणवीस म्हणाले.

Follow us on

मुंबईः हे नवीन सरकार निर्णय घेणारं आहे. फायलींवर बसणारं सरकार नाहीये. आमच्या हातात फक्त दोन ते सव्वादोन वर्ष आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलंय. या वक्तव्यातून त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या फुटीमुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेत उत्साह भरण्याजोगी घटना नुकतीच घडलीय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट प्रचंड उत्साहात आहे. मात्र शिंदे गट, मनसे, तसेच भाजपतर्फे उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका केली जातेय. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ एक मिनिट फाइल समोर ठेवायची आणि पॉझिटिव्हली निर्णय करायचा, अशा मानसिकतेचं आमचं सरकार आहे. शिंदे साहेब असो किंवा मी अतिशय वेगाने काम करतो. 20-29 ची मॅच आम्हाला खेळायची आहे. कारण दोन सव्वा दोन वर्षच आमच्या हातात आहेत, असं फडणवीस म्हणाले.