अमृतांना बोला पण सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का? अजित पवारांच्या टोल्याला फडणवीसांचं उत्तर

अमृतांना बोला पण सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का? अजित पवारांच्या टोल्याला फडणवीसांचं उत्तर

| Updated on: Dec 29, 2022 | 5:00 PM

अमृता वहिनींना बोला पण सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या टोल्याला उत्तर दिलं आहे.

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही असं अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी विधानसभेत वक्तव्य केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )यांनी आज विधानसभेमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) यांना उत्तर दिलं आहे. ‘अमृता वहिनींना बोला पण सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का’? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना केला आहे.

अजित पवार यांचं ते वक्तव्य काय?

तुम्ही महिलांबद्दल सांगताय भाजपला देखील महिलांची मत मिळाली. मग गेल्या सहा महिन्यापासून मंत्री करायला तुम्हा एक महिला सापडेना. हा कुठला कारभार, हा महिलांचा अपमान आहे. मी आता अमृता वहिनीनांचं सांगणार आहे. रात्री बघाच यांच्याकडे. फडणवीस यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवार यांना उत्तर

अजितदादांनी सांगितलं की, एकदा अमृता फडणवीस यांच्याशी बोला, पण अजितदादा हे बोलताना तुम्ही सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या टोल्याला उत्तर दिलं आहे.

Published on: Dec 29, 2022 04:55 PM