आजोबा, मुलगा आणि नातू… तिघांचे एकाचवेळी मतदान; एकनाथ शिंदे यांचं सहकुटुंब मतदान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत मतदान केलं. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे आणि मुलगा खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्याचा बालेकिल्ला पुन्हा एकदा त्याब्यात राहावा यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रचारात चांगलाच जोर लावला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत मतदान केलं. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे आणि मुलगा खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्याचा बालेकिल्ला पुन्हा एकदा त्याब्यात राहावा यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रचारात चांगलाच जोर लावला होता. मुंबईसह ठाण्यात भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र नवी मुंबई आणि इतर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. आज मतदानानंतर उद्या सकाळीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.
Published on: Jan 15, 2026 02:10 PM
