नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना खुशखबर! सरकारी संस्थांमध्ये 100 टक्के पदभरती होणार
Maharashtra Politics : सरकारी संस्थांमध्ये 100 टक्के पदभरतीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
राज्यातील सरकारी संस्थांमध्ये 100 टक्के पदभरतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अकृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि अशासकीय महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. तसेच, शासकीय अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमधील 100 टक्के रिक्त पदे भरण्यासही त्यांनी अनुकूलता दाखवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकृषी विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा आकृतिबंध लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
