VIDEO : मविआ सरकार इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार – Devendra Fadnavis यांचा सरकारवर गंभीर घणाघात
उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेतून भाजप सत्ताधारी सरकारला पूर्णपणे घेरण्याच्या स्थितीत आहे. त्याचेच संकेत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाले. राज्यातील ऊस गाळपाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटलेले नाहीत, तसेच राज्यातील भ्रष्टाचार चरम सीमेला पोहोचलाय, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेतून भाजप सत्ताधारी सरकारला पूर्णपणे घेरण्याच्या स्थितीत आहे. त्याचेच संकेत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाले. राज्यातील ऊस गाळपाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटलेले नाहीत, तसेच राज्यातील भ्रष्टाचार चरम सीमेला पोहोचलाय, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणावर टीका करताना, सरकारनं हा निर्णय शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतला नाही तर बेवड्यांसाठी घेतला आहे. हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे, असा ठपका देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला.
