ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे वाटप लॉजिकली केले पाहिजे : देवेंद्र फडणवीस
ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे वाटप लॉजिकली केले पाहिजे : देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशात तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज नवे रुग्ण आढळत असल्यामुळे चिंता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात औषधांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मृतांचीसुद्धा संख्या वाढते आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी राज्य सरकारला रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचे व्यवस्थित नियोजन लावले पाहिजे असे सांगितले आहे. तसेच लवकरात लवकर कोरोना महामारीतून सावरणे गरजेचे असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.
