चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची, भेट मात्र ठाकरे-फडणवीसांची!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईच्या हॉटेल ताज लँड एन्डमध्ये हे दोन महत्वाचे नेते भेटले आहेत. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच त्यामध्येच राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीने सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री हे आता हॉटेल मधून निघाले असले तरी राज ठाकरे मात्र अद्यापही हॉटेलच्या बाहेर पडलेले नाहीत. विशेष म्हणजे लोकसभेला याच हॉटेलच्या रूम नंबर ज्या 2101 मध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली होती, त्याच खोली क्रमांक 2101 मध्ये आज देखील राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
