Big Breaking : राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मhनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
हॉटेल ताज लँड एन्डमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहीवेळा आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेल ताज लँड एन्डमध्ये दाखल झालेले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकमेकांना भेटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे राज्यात राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यानंतर महिनाभरापासून या चर्चेला दोन्ही नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच आता अशाप्रकारे एकाच हॉटेलमध्ये या दोन्ही बड्या नेत्यांनी उपस्थित असणं, किंवा त्यांची भेट होण्याची शक्यता असणं यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ बघायला मिळत आहे. फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होईल का? हॉटेलमध्ये एकत्र येण्याचं नेमकं कारण काय आहे? की दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणासाठी याठिकाणी आले असून त्यांच्या भेटीबद्दलच्या चर्चा फेटाळल्या जातील हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
