…म्हणून खोटे आरोप लावून भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन : देवेंद्र फडणवीस

…म्हणून खोटे आरोप लावून भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन : देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 4:46 PM

विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई: विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बेशिस्त वर्तनाच्या कारणावरून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. सरकारमुळे आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिलं. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांना निलंबित केलं जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली. ओबीसींसाठी 12च आमदार काय आम्ही 106 आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jul 05, 2021 04:46 PM