VIDEO : नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार – Devendra Fadnavis
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच फडणवीस म्हणाले की, नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच फडणवीस म्हणाले की, नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहे. आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.
