Dhananajay Munde : धनुभाऊ मंचावर अन् एकच घोषणा… धनंजय मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाले, बस्स झालं रे नाटकं, मी पण हेच केलं… तू सीटून घे
आजच्या अभूतपूर्व दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोठ्या जनसमुदायामुळे झालेल्या गर्दीत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आणि सीटून घे असे आवाहन केले.
आजच्या अभूतपूर्व दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मंचावर धनंजय मुंडे येताच, उपस्थित जनसमुदायातून जोरदार आवाज आला आणि जल्लोष सुरू झाला. मुंडेंनी तातडीने कार्यकर्त्यांना आणि उपस्थितांना शांतता राखण्याचे आवाहन केले. “शांत बसा. शांत बसा. शांत बसा. खाली बसा. ए इथं खाली बसा रे. खाली बसा. जरा टेक. टेक. सीटून घे, सीटून,” असे म्हणत त्यांनी वारंवार सर्वांना जागेवर बसण्याच्या सूचना दिल्याचे पाहायला मिळाले. हा दसरा मेळावा एका अभूतपूर्व जनसागराने भरलेला होता. व्यासपीठावर आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि राज्यमंत्रिमंडळातील मंत्री म्हणून पंकजा मुंडे आणि प्रीतमताई यांचा उल्लेख केला. त्यांच्यासोबतच जानकर आणि इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
Published on: Oct 02, 2025 02:13 PM
