Dhananjay Munde : राजीनामा देऊन 2 महिने उलटले; धनंजय मुंडेंच्या पदाची पाटी मात्र अद्याप तशीच

Dhananjay Munde : राजीनामा देऊन 2 महिने उलटले; धनंजय मुंडेंच्या पदाची पाटी मात्र अद्याप तशीच

| Updated on: Apr 28, 2025 | 3:03 PM

Dhananjay Munde Resignation News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडे यांच्या पदाची पाटी 2 महिने उलटूनही अद्यापही तशीच आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्या मंत्रालयातील केबिनबाहेर त्यांच्या नावाची पाटी अजूनही तशीच आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असं या पाटीवर लिहिलेलं आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ तसंच विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र आता त्यांचा राजीनामा देऊन 2 महिने उलटूनही मंत्रालयात मुंडे यांच्या केबिन बाहेर त्यांच्या नावाची पाटी ही अद्यापही तशीच असल्याचं बघायला मिळालं आहे.

Published on: Apr 28, 2025 03:03 PM