Munde – Dhas : देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज पहिल्यांदाच एकत्र दिसणार मुंडे आणि धस

Munde – Dhas : देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज पहिल्यांदाच एकत्र दिसणार मुंडे आणि धस

| Updated on: Apr 17, 2025 | 9:08 AM

Beed Bhagwan Gad Program : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वादंगानंतर आज माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित राहणार आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात झालेल्या संघर्षानंतर आज ते पहिल्यांदाच एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. भगवान गडाचा नारळी सप्ताहाची सांगता आज शिरूर कासार गावातल्या पिंपळनेर या गावी होणार आहे. त्यासाठी ते दोघं उपस्थित राहणार आहेत.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपी असलेला वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे या प्रकरणात आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत देशमुखांना न्याय मिळावा म्हणून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्यातील हा संघर्ष टोकाचा झाला होता. मात्र यानंतर आज पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर उपस्थित राहणार आहेत. बीडच्या भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेचा कार्यक्रम शिरूर कासार येथे होणार आहे. त्यासाठी हे दोघं एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात आता महंत नामदेव शास्त्री या दोघांना कोणता सल्ला देतात हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Published on: Apr 17, 2025 09:08 AM