Dharmendra Health : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक! ब्रीच कँडीमध्ये उपचार, सध्या कशी तब्येत?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून, त्यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेतून भारतात बोलावण्यात आले आल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. धर्मेंद्र हे बऱ्याच काळापासून वयोमानाशी संबंधित आजारांशी झुंज देत आहेत. ते काही दिवसांपासून आयसीयूमध्ये आहेत.
धर्मेंद्र यांनाही ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. धर्मेंद्र गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ लोकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही काळापासून ते त्यांच्या आगामी “इक्कीस” चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
