Dhule Heavy Rain | धुळ्यात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं

| Updated on: Sep 08, 2021 | 8:18 AM

धुळे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे बेहाल पुन्हा समोर आले आहेत. महापालिकेचा गलथान कारभार देखील समोर आला आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वीच नाले साफसफाईचे काम करणं गरजेचं असताना ठराविकच नाले साफ केले.

Follow us on

धुळे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे बेहाल पुन्हा समोर आले आहेत. महापालिकेचा गलथान कारभार देखील समोर आला आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वीच नाले साफसफाईचे काम करणं गरजेचं असताना ठराविकच नाले साफ केले. त्यामुळे शहरातील उंच-सखल परिसरात म्हणजे मिल परिसर, लक्ष्मी नगर, चाळीसगाव रोड परिसर मुस्लिम बहुल भागात घराघरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा पालिका प्रशासनावर राग व्यक्त होत आहे. यातच  शहरातील जुन्या सिव्हिल हॉस्पिटल जवळ असलेल्या गटारीचे पाणी थेट व्यापारी संकुल गरुड कॉम्प्लेक्स येथे जमा होत असल्याने भरमसाठ कर आकारणी करुन देखील महापालिका सुविधा पुरवित नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.