Video : चित्रपटांमुळे समाजात गटबाजी?, दिग्दर्शक Nagraj Manjule म्हणतात…
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा प्रिमिअर शो नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटावरून होणाऱ्या वादावर भाष्य केलं.“प्रत्येकजण मतं मांडू शकतो. पण फिल्म बघून तुम्ही मतं मांडली आणि त्यात तथ्य असेल तर विचार करता येईल. चित्रपट करताना काही ठरवून करता येत नाही. कला ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा […]
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा प्रिमिअर शो नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटावरून होणाऱ्या वादावर भाष्य केलं.“प्रत्येकजण मतं मांडू शकतो. पण फिल्म बघून तुम्ही मतं मांडली आणि त्यात तथ्य असेल तर विचार करता येईल. चित्रपट करताना काही ठरवून करता येत नाही. कला ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा काही अंदाज आपण बांधू शकतो. पण अगदी तसंच होईल किंवा व्हायला पाहिजे, याचा हट्ट करू शकत नाही. कोण काय बोलतंय, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. असे दोन गट पडायची गरज नाही. चित्रपटाची अशी काही गटबाजी नसते. फिल्म येतात आणि आपणच दोन फिल्म्समध्ये भांडण लावतो, याला काही अर्थ नाही. फिल्मला फिल्मसारखं ट्रिट केलं पाहिजे. त्यात वादाचा मुद्दाच नाही”, असं नागराज मंजुळे म्हणाले.
Published on: Mar 18, 2022 02:12 PM
