Dnyaneshwari Munde : 18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट; ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळणारा का?

Dnyaneshwari Munde : 18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट; ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळणारा का?

| Updated on: Jul 16, 2025 | 5:26 PM

Mahadev Munde Case Updates : बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केल्यानंतर आता डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती दिली आहे.

बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केल्याची माहिती  समोर आलीय. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाला 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी हे टोकाचं पाऊल उचललं.  बीड एसपी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडे, आई-वडील आक्रमक झाले होते. यावेळी पोलीस आणि मुंडे कुटुंबामध्ये शाब्दिक चकमकही झाली. माझ्या सिंदूरला न्याय द्या, असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे भावूक झाल्या.

आधी बीड एसपी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या हातातून ज्वलनशील पदार्थ जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीड एसपी कार्यालयाच्या आवारातच विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या ज्ञानेश्वरी मुंडेंना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या ICU विभागात हलवण्यात आलंय. महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे वारंवार करत होत्या. न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी यापूर्वीच आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या न्यायाच्या लढाईकडे आता तरी प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 16, 2025 05:26 PM