Donald Trump : भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी तर फक्त… युद्धबंदीच्या वक्तव्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा यु-टर्न

Donald Trump : भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी तर फक्त… युद्धबंदीच्या वक्तव्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा यु-टर्न

| Updated on: May 15, 2025 | 7:45 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत बोलताना मोठा दावा केला होता. मी दोन्ही देशांवर व्यापारिक दबाव टाकला तेव्हाच युद्धविराम शक्य झाला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र आता ट्रम्प यांनी पटली मारली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युटर्न घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात मी मध्यस्थी केली नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मी फक्त मदत केली, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता घूमजाव केला आहे. आपल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानने यु्द्धविरामाची घोषणा केली, असं सातत्याने डोनाल्ड ट्रम्प म्हणताना दिसत होते मात्र आता थेट पलटीच मारली होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मी ते केले असे मी म्हणू इच्छित नाही, पण गेल्या आठवड्यात मी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील समस्या सोडवण्यास मदत केली, जी अधिकाधिक शत्रुत्वाची होत चालली होती.’  दरम्यान, डोनाल्ड  ट्रम्प यांच्या या वक्तव्याची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा होत आहे.

Published on: May 15, 2025 07:45 PM