Nanded News : भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून भीम अनुयायांचा जल्लोष

Nanded News : भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून भीम अनुयायांचा जल्लोष

| Updated on: Apr 14, 2025 | 9:53 AM

Nanded Bhim Jayanti Celebration : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये मध्यरात्री भव्य मिरवणूक काढण्यात आलेली होती. यावेळी आतिषबाजी देखील करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह राज्यसह देशात सगळीकडे बघायला मिळत आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यासाठी भीम अनुयायांनी काल रात्रीपासूनच जल्लोष केलेला ठिकठिकाणी बघायला मिळाला. आज चैत्यभूमीवर भीमअनुयायी मोठ्या संख्येने महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतानाच. दुसरीकडे नांदेडमध्ये देखील भीम जयंतीचा उत्साह बघायला मिळत आहे. काल रात्री 12 वाजताच जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आलेली होती. यावेळी पुतळा परिसराला विद्युत रोषणाई करून सजवण्यात देखील आलेलं दिसलं. फटाक्यांची आतिषबाजी करत भीम अनुयायांचा उत्साह यावेळी शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.

Published on: Apr 14, 2025 09:53 AM