Dr. Babasaheb Ambedkar Jayanati : सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच भीमसैनिकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आज उत्साहात साजरी केली जाणार आहे. तत्पूर्वी जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली बघायला मिळाली. यावेळी भीमसैनिक हे रात्रीपासूनच चैत्यभूमीवर जमायला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर वांद्रे ते वरळी सीलिंकवर देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्युत रोषणाई केलेली बघायला मिळाली. या सागरी सेतुवर लेजर लाइटटींगद्वारे बाबासाहेबांची प्रतिकृती सकरण्यात आलेली बघायला मिळाली. जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच भीमसैनिकांनी जयंती उत्साहात साजरी करण्यास सुरुवात केलेली बघायला मिळाली.
Published on: Apr 14, 2025 08:17 AM
