गड-किल्ल्यांवर दारू पिणं अत्यंत निंदनीय; पन्हाळ्यावरील व्हायरल व्हिडीओबाबत संभाजीराजेंची प्रतिक्रिया

गड-किल्ल्यांवर दारू पिणं अत्यंत निंदनीय; पन्हाळ्यावरील व्हायरल व्हिडीओबाबत संभाजीराजेंची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 1:39 PM

संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात या दोघांमध्ये गळाभेट झाली. राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते.

संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात या दोघांमध्ये गळाभेट झाली. राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. “गडकिल्ल्यांचे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. कुठल्याही किल्ल्यावर दारू पिणं हे निंदनीय आहे. यासाठी एका सिस्टीमची गरज आहे. मी उद्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्या चर्चेनंतर पुढील रुपरेषा ठरेल”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्ल्यावरील व्हिडीओबद्दल दिली.

Published on: Jul 25, 2022 01:39 PM