Jalna | जालना एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी

| Updated on: Nov 26, 2021 | 2:40 PM

जालन्यात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित बाजार समितीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन खोतकर सभापती आहेत.

Follow us on

जालन्यात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित बाजार समितीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन खोतकर सभापती आहेत. अर्जुन खोतकर यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. जालण्याचे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या राहत्या घरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कार्यालयावर आज ईडीने छापेमारी सुरू केलीय. सध्याही या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी तपासणी करत आहे. किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे जालना येथील साखर कारखाना संदर्भात अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना खरेदी करतांना आर्थिक गैर व्यवहार केल्याचा आरोप केला होता