Anil Parab | अनिल परब यांना ईडी कडून समन्स, 28 सप्टेंबरला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Anil Parab | अनिल परब यांना ईडी कडून समन्स, 28 सप्टेंबरला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 10:01 AM

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. अनिल परब यांना पाठवण्यात आलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी त्यांना 31 ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. अनिल परब यांना पाठवण्यात आलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी त्यांना 31 ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांना 29 ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.