Sanjay Raut – Eknath Shinde : शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला

Sanjay Raut – Eknath Shinde : शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला

| Updated on: Apr 20, 2025 | 2:56 PM

Sanjay Raut on Eknath Shinde : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतापले होते. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले आहेत. त्यावर राज – उद्धव ठाकरे येणं एकनाथ शिंदे यांना नको आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तसंच एकनाथ शिंदेंचा संताप आम्ही संजू शकतो, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, कामाचं बोला यार, असं म्हंटल शिंदेंनी माइक बाजूला करत संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळालं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिंदे का संतापले?कारण त्यांना हे नको आहे. आम्ही कामाचंच करतो आहे. तुम्ही तुमच्या कामाचं बघा. ते सध्या दरे गावात आहेत. तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखाला भेटायला दिल्लीत जातील. तर ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं काम करू, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Published on: Apr 20, 2025 02:56 PM