Shinde Shivsena :  शिंदे यांच्यामुळे 2022 ला भाजप सत्तेत अन् ताकदवान, शिवसेनेच्या बड्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

Shinde Shivsena : शिंदे यांच्यामुळे 2022 ला भाजप सत्तेत अन् ताकदवान, शिवसेनेच्या बड्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Dec 06, 2025 | 9:50 PM

मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या 2022 मधील भूमिकेमुळे भाजप सत्तेत आली आणि मजबूत झाली. यावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मंगलप्रभात लोढांच्या मुंबई महापौरपदावरील वक्तव्याने भाजप आणि शिंदे गट नेत्यांमध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीला ॲनाकोंडा आणि एक मालक असे संबोधून टीका केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तेच्या श्रेयवादावरून जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच मंत्री शंभूराज देसाई यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या मते, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप सत्तेत आली आणि राज्यात अधिक ताकदवान बनली. देसाई यांनी असेही नमूद केले की, 2014 पर्यंत भाजप महाराष्ट्रात इतकी मजबूत नव्हती, परंतु शिंदे यांच्या भूमिकेने भाजपला सत्तेत चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना-भाजप युती पुनरुज्जीवित झाली. शंभूराज देसाईंच्या या विधानानंतर महायुतीमधील इतर नेत्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या.

संजय गायकवाड यांनी “आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आले” असे म्हटले. यावर नवनाथ बन यांनी “महायुती होती म्हणून आपण सत्तेत आहोत” असे सांगत, कोण कुणामुळे सत्तेत आहे ही श्रेयवादाची लढाई नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघे एकत्र असल्यामुळेच सत्तेत आहेत आणि याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Published on: Dec 06, 2025 09:50 PM