Neelam Gorhe Video : ‘दोन मर्सिडीजवर एक पद…’, नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप
नवी दिल्लीत सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. पण ते असताना मला हे बोलायला आवडलं असतं’, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार करत चांगलाच समाचार घेतला. ‘उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केलं. महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना आमदारकी दिली. विधान परिषदेचं उपसभापती बनवलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्या का? पावत्या घेऊन याव्या’, असं राऊत म्हणाले. दरम्यान, त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाले, मला आमदारकी मिळावी म्हणून संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मी काहीच दिले नाही. मला एक रुपया पक्षाने मागितले नाही. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहे. माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या. व्यक्ती म्हणून उद्धव साहेब संस्कृत नेते आहे. परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
