Eknath Shinde : पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन, शिंदेंचा खोचक टोला

Eknath Shinde : पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन, शिंदेंचा खोचक टोला

| Updated on: Oct 20, 2025 | 3:05 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर मनोमिलन नाटकाचे प्रमोशन सुरू असल्याची खोचक टिप्पणी केली. पूर्वी भाऊबंदकी गाजले होते असे ते म्हणाले. शिवसेनेच्या यशाने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या पोटदुखीसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत सध्या मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू असल्याची टिप्पणी केली. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजले होते, आता मनोमिलन सुरू आहे, असे शिंदे म्हणाले. राजकारणामध्ये आज राजकारण नसून केवळ नाट्य मंदिराचा कार्यक्रम असल्याचा सूर त्यांनी लावला.

यावेळी शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अशोक मामांच्या गाजलेल्या सारखं छातीत दुखतंय या नाटकाचा संदर्भ देत, शिवसेनेचे यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. या पोटदुखीवर उपाय म्हणून हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई आणि राज्यभरात हा दवाखाना उपलब्ध आहे. मात्र, तरीही काही विरोधकांची पोटदुखी थांबत नसल्याचे निरीक्षण शिंदे यांनी नोंदवले आणि त्यांच्याकडे काही जालीम उपाय असल्यास सांगावा अशी विचारणाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Published on: Oct 20, 2025 03:05 PM