Vijay Vadettiwar :..तर निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, वडेट्टीवारांचं मोठं विधान

Vijay Vadettiwar :..तर निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, वडेट्टीवारांचं मोठं विधान

| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 11:20 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मास्क लावण्याचं आवाहन केलंय.

नागपूर : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत (increase) आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचं भय निर्माण झालंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मास्क लावण्याचं आवाहन केलंय. दरम्यान, राज्यातील (State) रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे राज्यात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं. निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी लोकांनी काळजी घ्यावी. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल. शाळा महाविद्यालये सुरू होतात. पावसाला सुरुवात होईल. म्हणून संसर्ग वाढू नये याची काळजी घेणारे नियम करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावे. मात्र वाढ झाली तर राज्य सरकार यावर निर्णय घेईल. कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, असं मोठं विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

Published on: Jun 03, 2022 11:20 AM