मोबिलिटीच्या भविष्याची इंजीनियरिंग… टाटा ACE Pro बाबत अनिरुद्ध कुलकर्णी यांचे प्रतिपादन

| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 5:30 PM

पुण्यातील लॉन्च इव्हेंटमध्ये टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी टाटा ACE Pro चे सादरीकरण करत वाहनाची ताकदवान कामगिरी आणि भारतातील कठीण रस्त्यांवर झालेल्या चाचण्या यावर प्रकाश टाकला. त्यांनी ACE Pro हे केवळ वाहन नसून उद्योजकांसाठी अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि फायदेशीर भविष्याची दिशा असल्याचं सांगितलं.

पुण्यातील लॉन्च इव्हेंटमध्ये, टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि प्रमुख अभियंता (व्यावसायिक वाहने) अनिरुद्ध कुलकर्णी यांनी नव्या टाटा ACE Pro चे सादरीकरण केले. यावेळी कुलकर्णी यांनी टाटा मोटर्सच्या ग्राहकांना सदैव सर्वोत्तम देण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. भारताच्या कठीण भूप्रदेशांवर लाखो किलोमीटर प्रत्यक्ष रस्त्यावर चाचण्या घेऊन सिद्ध झालेली या वाहनाची ताकदवान कामगिरी त्यांनी अधोरेखित केली.

ACE Pro हे केवळ एक उत्पादन नसून, विक्रेते आणि उद्योजक यांना सक्षम करणाऱ्या अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि नफा देणाऱ्या भविष्याकडे उचललेलं एक पाऊल आहे, असं त्यांनी नमूद केलं. या नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारताच्या लहान व्यावसायिक वाहन क्षेत्रातील नवकल्पनांची उंची वाढवली आहे.

 

 

Published on: Jun 27, 2025 05:30 PM